माझ्या मनात वाजले तिच्या पायातले पैँजण,
साक्ष देतो तिचा गोरा हात,
मैत्री चे लावायचे होते विर्जण..1
गुणगुणतो गाणी आम्ही एका सुरात,
चाललो मी वाहून त्या भावनांच्या पुरात..2
आले डोळ्यात पाणी झाले जेव्हा गाणे बेसूर,
का गं डोळ्यात पाणी विचारता आई ने,
आवाज माझा भेसूर..
आई बोचतो डोळ्यात त्या उद्बत्ती चा धुर,
कसा थांबवु मी हा भावनांचा पूर..3
हात जोडुन काय मागु त्याच्या कडे,
नको जाउस सोडुन मला
तुला म्हणु तरी कसे..
लढण्याचा आव आणला तरी
पाण्याशी वैर करत नाहित मासे,
स्वभावंच शेवटी तो त्यांचा
घाबरणारंच ससे..4
कोण हे मासे आणि कोण हे ससे?
कधी लढायचं हे नं कळणारे मासे..
कधीही कशालाही घाबरणारे ससे..
सगळेच वागतात अनेकदा असे,
जेव्हा उलटे पडतात आयुष्यात फासे..
आपणंच तडफडणारे मासे
आणि आपणंच घाबरणारे ससे...5
No comments:
Post a Comment