Thursday, October 31, 2013

'खेळ'

पाहतंच राहीलो मी,
जिँकता जिँकता हरलो मी तुला रमी..
पाहतंच राहीलो मी,
प्रेमाला लेखलेस तु जेव्हा कमी..1
शब्दात नाही सांगीतलेस कधी,
तशी आहेसंच तु साधी,
दोष तुझा नव्हताच,
मलाच विचार करायला हवा होता आधी..2
भौतिक सुख देता येणार नव्हतेच तुला,
खुप मोठा होता तुझ्या स्वप्नातला झुला,
भावनिक गरजा भागवल्या असत्या सार्या,
पण नव्हतेच ते नशीबात आपल्या..3
लग्न केलेस तु तेव्हा संपला आपला खेळ,
भौतिक आणी भावनिक चा घाल आता तरी मेळ,
दोघे मिळुन खा तुझी आवडती भेळ,
एकमेकां विसरुन पुढे चलण्याची आली आहे आता वेळ..4

समुद्र..

हातात गुंफलेले दोन हात,
नजरेला नजर देते साथ,
भावनांच्या समुद्रात गेलेत इतके खोल,
सावरता येइ नात यांचे तोल...1
स्वप्नवत वाटे हा romantic spot,
रहावे इथेच घेउन एखादा plot,
तीच्या ओठांसाठी आतुरलेत ओठ,
And she says
' I Love You a lot'..2
Heartbeats चा रेट वाटे एकशेसाठ,
पळवावी वाटे प्रेमाची गाडी-speed दोनशेसाठ,
दिसे मग एकंच व्यक्ती फिरलात जरी degree तिनशेसाठ,
एकमेकांचे शब्द ही आता झालेत पाठ...3
घातली आहे देवाने यांची गाठ,
फिरणार एकमेका बरोबर आता दिशा आठ,
लखलखले हजारो दिवे दाखवायला यांच्या प्रेमाची power,
श्वास रोखुनी न्याहाळत आहेत दोघे,
डोळे दिपवणारा Eiffel Tower...
Eiffel Tower...4

Wednesday, October 30, 2013

पत्र..

आवडतो का तुला मी, एकदाच सांगुन टाक.. तुझ्या घरचे रस्ते ही आता ओळखते मझ्या गाडीचे चाक.. आवडतेस तु मला सांगीतले मी जेव्हा, मारुन तुला हाक.. तेव्हा पासुनंच वाट पहातोए गुलाबजाम ची.. तुझा साखरेचा पाक.. तुझाच साखरेचा पाक...

Sunday, October 20, 2013

' तो '

केली त्याने निर्मीती आपली आणि बनवले आपल्याला कार्यक्षम,
वेगवेगळ्या टप्प्यांवर आयुष्यात त्यासाठीच करतो आपण श्रम..1
तुला हवं तसं आता मी वागतो ना! मग दे ना मला घेउन Cricket Kit,
खाइन आता तु म्हणशील ते सगळं आणि राहीन मी Fit..2 मला हवं ते मी मिळवणारंच म्हणते वय वर्ष बावीस,
होउन जाउदेत मग दोन हात कारण आपला आकडा छत्तीस..3 Movies, मस्ती आणि Branded वस्तू,
घरात विसंवाद आणि दोषी ठरते वास्तु..4
दिला आहे सर्वाँना त्याने एक तरी काटा सलणारा,
मी पणा सोडुन द्यावा हे अनुभवातुन शिकवणारा..
फक्त कार्यक्षम असुन भागत नाही मग होतो आपण आयुष्यात केव्हा तरी निर्मितीक्षम,
जोडले जातो तेव्हा मग त्या निर्मात्याशी आणि संपतात सारे श्रम..5

कार्य

प्रत्येकाला हवं असतं कोणी तरी आपल्या कडे थोडं लक्ष देणारं, आपण आजारी असल्यास आपल्या रोपट्याला पाणी घालणारं..1 प्रत्येकाला हवं असतं असं एक घर, स्वताःच्या आनंदासाठी जिथे करता येतिल काही बदल आणि जिथे इतरांच्या आनंदासाठी स्वताःत घडुन येतात काही बदल..2 प्रत्येकाला करायचं असतं असं काही काम, जिथे तितका महत्त्वाचा नसेल दाम.. प्रत्येकाला हवं असतं असं एक स्थान, जिथुन होणार नाही आपले प्रस्थान..3 पण प्रत्येकालाच काहितरी कायम मिळत असतं, त्या शिवाय माझ्या कडुन ही कविता लिहिण्याचं आणि तुमच्या कडुन पुर्ण वाचायचं कार्य घडलं नसतं...4

Mood...

आजकाल जरा खराबंच असतात आमच्याकडे Mood,
मिठ जास्त पडलेले खारट Food..
आजकाल जरा खराबंच असतात आमच्याकडे Mood,
हवं ते नं मिळाल्याने nothing feels Good..
चवताळतात मग माणसं आणि घेतात सूड,
क्षणीक आसुरी आनंद तरी शांत बसे ना त्यांचे बूड..1
चुक झाली की शिक्षा,
घालत नाही आम्ही भिक्षा..
तुटले की खेळतो आम्ही कुस्ती, शक्य आहे जोडणं पण आवडत नाही आम्हाला दुरुस्ती..2
आजकाल जरा खराबंच असतात आमच्याकडे Mood,
टाकून ही देता येत नाही असे हे नात्यांचे वाळवी लागलेले Wood..3

Wednesday, July 17, 2013

पूर..

माझ्या मनात वाजले तिच्या पायातले पैँजण,
साक्ष देतो तिचा गोरा हात,
मैत्री चे लावायचे होते विर्जण..1

गुणगुणतो गाणी आम्ही एका सुरात,
चाललो मी वाहून त्या भावनांच्या पुरात..2

आले डोळ्यात पाणी झाले जेव्हा गाणे बेसूर,
का गं डोळ्यात पाणी विचारता आई ने,
आवाज माझा भेसूर..
आई बोचतो डोळ्यात त्या उद्बत्ती चा धुर,
कसा थांबवु मी हा भावनांचा पूर..3

हात जोडुन काय मागु त्याच्या कडे,
नको जाउस सोडुन मला
तुला म्हणु तरी कसे..
लढण्याचा आव आणला तरी
पाण्याशी वैर करत नाहित मासे,
स्वभावंच शेवटी तो त्यांचा
घाबरणारंच ससे..4

कोण हे मासे आणि कोण हे ससे?
कधी लढायचं हे नं कळणारे मासे..
कधीही कशालाही घाबरणारे ससे..
सगळेच वागतात अनेकदा असे,
जेव्हा उलटे पडतात आयुष्यात फासे..
आपणंच तडफडणारे मासे
आणि आपणंच घाबरणारे ससे...5