Thursday, October 31, 2013

'खेळ'

पाहतंच राहीलो मी,
जिँकता जिँकता हरलो मी तुला रमी..
पाहतंच राहीलो मी,
प्रेमाला लेखलेस तु जेव्हा कमी..1
शब्दात नाही सांगीतलेस कधी,
तशी आहेसंच तु साधी,
दोष तुझा नव्हताच,
मलाच विचार करायला हवा होता आधी..2
भौतिक सुख देता येणार नव्हतेच तुला,
खुप मोठा होता तुझ्या स्वप्नातला झुला,
भावनिक गरजा भागवल्या असत्या सार्या,
पण नव्हतेच ते नशीबात आपल्या..3
लग्न केलेस तु तेव्हा संपला आपला खेळ,
भौतिक आणी भावनिक चा घाल आता तरी मेळ,
दोघे मिळुन खा तुझी आवडती भेळ,
एकमेकां विसरुन पुढे चलण्याची आली आहे आता वेळ..4

No comments:

Post a Comment