प्रत्येकाला हवं असतं कोणी तरी आपल्या कडे थोडं लक्ष देणारं,
आपण आजारी असल्यास आपल्या रोपट्याला पाणी घालणारं..1
प्रत्येकाला हवं असतं असं एक घर,
स्वताःच्या आनंदासाठी जिथे करता येतिल काही बदल आणि जिथे इतरांच्या आनंदासाठी स्वताःत घडुन येतात काही बदल..2
प्रत्येकाला करायचं असतं असं काही काम,
जिथे तितका महत्त्वाचा नसेल दाम..
प्रत्येकाला हवं असतं असं एक स्थान,
जिथुन होणार नाही आपले प्रस्थान..3
पण प्रत्येकालाच काहितरी कायम मिळत असतं,
त्या शिवाय माझ्या कडुन ही कविता लिहिण्याचं आणि तुमच्या कडुन पुर्ण वाचायचं कार्य घडलं नसतं...4
No comments:
Post a Comment