केली त्याने निर्मीती आपली आणि बनवले आपल्याला कार्यक्षम,
वेगवेगळ्या टप्प्यांवर आयुष्यात त्यासाठीच करतो आपण श्रम..1
तुला हवं तसं आता मी वागतो ना! मग दे ना मला घेउन Cricket Kit,
खाइन आता तु म्हणशील ते सगळं आणि राहीन मी Fit..2 मला हवं ते मी मिळवणारंच म्हणते वय वर्ष बावीस,
होउन जाउदेत मग दोन हात कारण आपला आकडा छत्तीस..3 Movies, मस्ती आणि Branded वस्तू,
घरात विसंवाद आणि दोषी ठरते वास्तु..4
दिला आहे सर्वाँना त्याने एक तरी काटा सलणारा,
मी पणा सोडुन द्यावा हे अनुभवातुन शिकवणारा..
फक्त कार्यक्षम असुन भागत नाही मग होतो आपण आयुष्यात केव्हा तरी निर्मितीक्षम,
जोडले जातो तेव्हा मग त्या निर्मात्याशी आणि संपतात सारे श्रम..5
No comments:
Post a Comment